लहान मुलांना आताच्या काळात मोबाईलचे मोठे व्यसन लागले आहे. कोणतीही गोष्ट मनासारखी झाली नाही तर मुलं टोकाच पाऊल उचलत आहेत. मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने मोबाईल काढून घेतला म्हणून त्या मुलाने आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवार,८ जून रोजी घडली आहे.
ओम भरत असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. हा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळात होता. त्यांनतर त्याची आई रागावली आणि तिने त्याच्या हातातून रागाने फोन काढून घेतला. आई रागावल्याने रागात ओम घर सोडून गेला. घर सोडून जाताना त्याने सुसाइड नोट लिहून ठेवले. या पत्रात त्याने मी आत्महत्या करत असून पुन्हा कधीच परत येणार नसल्याचे म्हटले. घरातल्यांनी सुसाइड नोट मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ओमचा शोध सुरू केला.
हे ही वाचा:
पहिली बायोटेक स्टार्टअप एक्स्पो पंतप्रधानांच्या हस्ते सुरू
‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’
१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक
मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली
मुंबईमधील मालाड आणि कांदिवली स्टेशन दरम्यान एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. बोरिवली रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येच्या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरावर शोककळा पसरली आहे.