उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णय सध्या चर्चेत आहे. पैसे घेऊन बदली करून देत असल्याच्या आरोपावरून योगींनी सहा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्पेशल ड्युटी ऑफिसर अनिल कुमार पांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच जेष्ठ अधिकार्यांचे निलंबन केले आहे.
उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या विभागातील अधिकारी अनिल कुमार पांडे आणि पाच अधिकाऱ्यांवर हे आरोप करण्यात आले आहेत. आदित्यनाथ सरकारने कारवाई केलेले पांडे यांनी पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये काम केले आहे. पांडे हे जितीन प्रसाद केंद्रात मंत्री असताना त्यांच्यासोबत काम करत होते. त्यामुळे पिडब्लूडी विभागातील अधिकाऱ्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जितीन प्रसाद यांना मोठा धक्का बसला आहे.
मात्र, अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर प्रसाद यांनी एक निवेदन जाहीर केले. या निवेदनाद्वारे, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाशी असलेली बांधिलकी व्यक्त करत आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक केले आहे. त्यांनी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात नाराजी असल्याच्या वृत्तांना खोडून काढले आहे.
हे ही वाचा:
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; यादी वाचा सविस्तर
…म्हणून सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!
मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…
उत्तर प्रदेशचा अब्दुल जमील झाले श्रवणकुमार
यावेळी प्रसाद यांची भूमिका ब्रजेश पाठक आणि दिनेश खाटीक यांसारख्या काही मंत्र्यांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध होती, ज्यांनी अलीकडेच जेष्ठ नोकरशहांना लक्ष्य करून सरकारच्या कार्यपद्धतीविरुद्ध आवाज उठवला होता.