26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामासीआयडी चौकशीतून विनायक मेटे यांच्या मृत्यूचे 'गूढ' उकलणार

सीआयडी चौकशीतून विनायक मेटे यांच्या मृत्यूचे ‘गूढ’ उकलणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस महासंचालकाना मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश

Google News Follow

Related

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. मेटे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

हे ही वाचा:

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!

आर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. या अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. मेटे यांची गाडी ट्रकला धडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर या अपघातातील ट्रक ड्रायव्हरने पळ काढला होता. दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी सहा पथके तयार केली होती. अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली असून ट्रकही ताब्यात घेतला आहे. मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याचीही पोलिस चौकशी करत आहेत.

हे ही वाचा:

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!

आर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य

या अपघातानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी आणि शिवसंग्रामचे कार्यकर्ते यांनी यात या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला. मेटे यांचा अपघात झाला त्यावेळी त्यांचा आधीचा चालक समाधान वाघमारे सुटीवर होता. ‘शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा. त्याच्यामधून बरंच काही बाहेर येईल असं विधान वाघमारे यांनी केलं आहे. त्यामुळे एकूणच हा अपघात की घातपात असा संशय कल्लोळ वाढलेला आहेत. त्याचवेळी विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहे. या चौकशीनंतरच्या निष्कर्षानंतरच मृत्यूमागील खरे कारण समोर येऊ शकणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा