28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरला अटक

ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरला अटक

ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारीही अटकेत

Google News Follow

Related

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात आतापर्यंत रुग्णालयाचे काही कर्मचारीही कारवाईच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता या प्रकरणात प्रथमच दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रूग्णालयानंतर आता पुणे येथील येरवडा कारागृह रडारवर आले आहे. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अशा दोन जणांना अटक केली आहे. प्रथमच मोठ्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे.

पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक केली. त्यांच्या केलेल्या चौकशीतून येरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. संजय मरसाळे यांचे नाव समोर आले. सुधाकर इंगळेमार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी सुधाकर इंगळे आणि डॉक्टर संजय मरसळे या दोघांना अटक केली आहे.

डॉक्टर संजय मरसळे हे ललित पाटील पळून जाण्याच्या दोन दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होते. मरसळे यांनी पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर पोलिसांनी डॉक्टर संजय मरसळे याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यात त्यांना अभिषेक बलकवडे याचे कॉल मिळाले. बलकवडे हा ललित पाटील याचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार आहे.

हे ही वाचा:

नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्हांत आता शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब

‘मिचॉंग’ने चेन्नईला झोडपलं; ३३ विमाने बंगळूरूकडे वळवली तर १४४ रेल्वे गाड्या रद्द

केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?

महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!

ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहानंतर ससूनमधील एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला याआधी निलंबित करण्यात आले होते. ललित पाटीलला याला पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा