26 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामा२६ वर्षांपूर्वी अशी झाली होती डॉ. दत्ता सामंत यांची हत्या, राजन सुटला

२६ वर्षांपूर्वी अशी झाली होती डॉ. दत्ता सामंत यांची हत्या, राजन सुटला

हत्या झाली त्यावेळी दुबईत असल्याची राजनची माहिती

Google News Follow

Related

मुंबईत १९९७मध्ये कामगार नेते दत्ता सामंत यांची १७ गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणातून गुंड छोटा राजनची विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हत्येच्या कटाशी थेट संबंध दाखवणारे पुरावे उपलब्ध झाले नसल्याने सीआयडीचाच तपास ग्राह्य धरण्याची विनंती सीबीआयतर्फे करण्यात आली. अखेर सर्व साक्षीपुराव्यांचा विचार केल्यानंतर सामंत यांची हत्या व हत्येच्या कटाशी आरोपी राजनचा संबंध दाखवणारे पुरेसे पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायाधीशांनी त्यांना निर्दोष ठरवले.

 

 

प्रीमियर ऑटो लिमिटेड कारखान्यातील संपावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात आले होते. वकील सुदीप पासबोला यांनी राजन याची बाजू मांडली. राजन हा दिल्लीच्या तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाला. राजन याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. सन १९८६ ते १९९३ या कालावधीत आपण दुबईत असल्याचे त्याने सांगितले आणि आपल्याला माहीत नसलेल्या कारणांमुळे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही खोटी केस होती, असा दावा राजन याने केला.

 

 

बचाव पक्षाने असाही युक्तिवाद केला की, मागील खटल्यात गुन्हेगारी कटाचा गुन्हा सिद्ध झाला नव्हता. राजन सध्या २०११मध्ये झालेल्या पत्रकार जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सन २०१५मध्ये छोटा राजन याला बालीमधून भारतात हस्तांतरित करण्यात आले होते. या खटल्यातील काही साक्षीदार फितूर ठरले.

 

हे ही वाचा:

छोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

अंदमान आणि निकोबारमध्ये जोरदार भूकंप

मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

 

१६ जानेवारी १९९७ रोजी सकाळी एका सायकलस्वाराने पवईजवळ दत्ता सामंत यांचा रस्ता अडवला. सामंत यांची टाटा सुमो जवळ येत होती. तेव्हा पाच हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला घेरले आणि गोळीबार केला. त्यांना १७ गोळ्या लागल्या होत्या. सामंत यांना त्यांचा मुलगा डॉ. प्रशांत सामंत यांच्या मालकीच्या नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. सामंत यांचा चालक प्रशांत याने फिर्यादी साक्षीदार म्हणून जबाब दिला.

 

 

दुसऱ्या साक्षीदाराने न्यायालयाला सांगितले की, तो फाइल विकत घेत होता, तेव्हा त्याने दोन जखमींना पाहिले आणि सामंत यांचा मुलगा भूषण याला याची माहिती दिली. त्याने तिथून एक व्यक्ती पळताना पाहिली, त्यानेही त्या व्यक्तीला ओळखले. आणखी एक साक्षीदार, दुकानाचा मालक गोळ्यांचा आवाज ऐकून बाहेर आला. त्याला चार ते पाच जण रिक्षात बसून गांधीनगरच्या दिशेने जाताना दिसले. त्याने ओळख परेडदरम्यान तीन आरोपींची ओळख पटवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा