छत्तीसगडमधील सुकमा गावात नक्षलवाद्यांनी दोन महिलांची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.सोडी हुंगा आणि माडवी नंदा असे या महिलांची नावे आहेत.या दोन्ही महिला दुल्लेड गावातील रहिवासी आहेत.नक्षलवाद्यांच्या पामड एरिया कमिटीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी नुकतीच सुकमा जिल्ह्यातील सुकमा-विजापूर सीमेवर असलेल्या सिल्गर गावाला भेट दिली होती.सिल्गर हे गाव राज्यातील नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे.३० जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी सिल्गर गावात हल्ला केला होता.या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले होते.या हल्ल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी सिल्गर गावाला भेट देऊन तेथील सैनिक आणि स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधला.गावातील नागरिकांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत सध्याच्या परिस्थितीचा आढवा घेत माहिती गोळा केली.
हे ही वाचा:
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!
संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!
चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनची ऐतिहासिक कामगिरी!
मंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या काही दिवसात पुन्हा नक्षलवाद्यांनी सुकमा गावात दोन महिलांची हत्या केली.नक्षलवाद्यांच्या पामड एरिया कमिटीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.सोडी हुंगा आणि माडवी नंदा असे महिलांचे नाव असून त्या दुल्लेड गावातील रहिवासी आहेत.पोलिसांशी हात मिळवणी करून पोलिसांना गुप्त माहिती देत असल्याचा आरोप नाक्षवाद्यांच्या पामड एरिया कमिटीने केला आहे.