मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या एका मोठ्या अपघातात केमिकल टँकरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एक्स्प्रेस हायवेवरील लोणावळ्याच्या हद्दीत कुने गावाच्या पुलावर हा अपघात घडला. हा टँकर मुंबईकडून पुण्याकडे जात होता. त्यावेळी या टँकर उलटला आणि आग लागली. ही आग विझविण्यात आली असून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव थांबविण्यात आली होती तसेच ती अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.
केमिकल घेऊन चाललेल्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आणि त्यात केमिकल अंगावर पडून या पुलाखालील चार जण होरपळले. चालकही यात मृत्युमुखी पडला आहे. पुलाखालील काही गाड्याही या केमिकलच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचेही नुकसान झालेले आहे.
केमिकल टँकर डिव्हाईडरला धडकून आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ११.५० वाजता घटनास्थळी पोहोचून एका जखमीला तात्काळ IRB अँब्युलन्सने रवाना करण्यात आले. तसेच अँम्ब्युलन्स, देवदूत, एक्स्पर्ट टीम, अग्निशमन दल यांना पाचारण करण्यात आले.
हे ही वाचा:
गेली ५० वर्षे दोरखंडाच्या सहाय्याने ते उतरतात ४० फूट खोल विहिरीत
‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार
दरम्यान, मुंबई, पुणे यांना माहिती देऊन खालापूर टोल व उर्से टोल येथे गोल्डन अवर्स सुरू करण्यात आले व छोट्या वाहनांना खंडाळा एक्झिट दिशेने सोडण्यात आले. लोणावळा एक्झिट येथून मुंबईकडे जुन्या हायवेने वाहतूक वळविण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने पुणे मुंबई कॉरिडॉर हा ११.४० ते १२.४० दरम्यान बंद करण्यात आला होता. सदर अपघातामध्ये चालक घटनास्थळी मृत्युमुखी पडला. जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा,…— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 13, 2023