उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मठाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन जवानांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मुर्तुजा अब्बासी असे हल्लेखोराचे नाव असून तो सिव्हिल लाइन्समधील गोरखपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकताच तो मुंबईहून आला होता.
मुर्तुजा अब्बासी यांनी आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. दरम्यान त्याची मानसिक परिस्थिती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. गोरखनाथ मंदिर आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा लक्षात घेऊन पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हल्लेखोराबाबत तपशील गोळा करत आहेत. या तपासाअंतर्गत दहशतवाद विरोधी पथकाने आज त्याच्या निवास्थानी छापेमारी केली. सानपाडा येथील मिलेनियम टॉवर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराविरुद्ध गोरखनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
चेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे
पुरोहितांना संरक्षण देण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी
गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक
पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, एक ठार
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओ मध्ये मुर्तजा अब्बासी हा गोरखनाथ मंदिराच्या गेटजवळ धारदार शस्त्राने वार करून दोन पीएसी जवानांना जखमी करत असल्याचे दिसत आहे.तर इतर काही पोलिस त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पीएसीच्या २० व्या बटालियनचे दोन जवान गोपाल गौंड आणि अनिल पासवान हे या हल्ल्यात जखमी झाली आहेत.