…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा

…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा

क्रेडिट कार्ड किंवा आपल्या बॅंकेसंबंधी माहिती कुणालाही देऊ नये हे वारंवार आपल्याला सांगण्यात येते. अनेकदा बेनामी फोनवरून आपल्याल ओटीपी विचारला जातो. काहीजण तो लगेच सांगतातही. परंतु याबाबत सावधान करूनही लोक चुका करतात. या चुका महागात पडतात तरीही चुका थांबत नाहीत आणि असे गुन्हेही कमी होत नाहीत. रौनक गिडवानी नामक इसमाने मित्राच्या क्रेडिट कार्डचा वापर करून असाच गंडा घातलेला आहे. त्यामुळे विश्वास नेमका कुणावर ठेवावा हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खार परिसरातील ही घटना असून, तक्रारदार तरुण हा खारमध्ये राहतो. त्याने त्याच्या क्रेडिट कार्डमधून ४५ हजार रुपये काहीतरी व्यवहार झाला म्हणून पोलिस स्टेशनला तक्रार केली. त्यावेळी हे पैसे त्याच्या जवळच्या मित्राकडे म्हणजेच रौनकच्या बॅंकेत वळवल्याचे दिसले. तिथून या प्रकरणाचा छडा लागला.

हे ही वाचा:

मंदिरे तर उघडणार; पण प्रसाद, फुलांवर फुली

वस्त्रोद्योग व्यवसायासाठी मोदी सरकारची मोठी योजना

‘राहुल गांधी प्रत्येक मुद्द्याचे फक्त राजकीय भांडवल करतात’

ड्रॅगनच्या घरातून काय उलगडणार?

 

मार्च महिन्यामध्ये तक्रारदाराच्या खात्यातून ४५ हजार रुपयांचा व्यवहार झाला. हा व्यवहार सदर तक्रारदार तरुणाने केला नव्हता. मुख्य बाब म्हणजे त्याने ओटीपी कुणालाही शेअरही केला नाही. परंतु तरीही क्रेडिट कार्डचा वापर झालाच कसा असा प्रश्न तक्रारदाराला पडला होता. अखेर त्याने खार पोलिसात जाऊन याबाबत तक्रार नोंदवली. त्यावेळी त्याने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात ही तक्रार नोंदवली होती. परंतु नंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मात्र पायाखालची जमीनच सरकली. त्याच्याच मित्राने त्याच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर केलेला होता हे चौकशीअंती उघड झाले. त्यांनी रौनकला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याच्याकडून हा गुन्हा कबूल करवून घेतला. आपल्याच मित्राने हा गुन्हा केलेला समोर आल्यावर तक्रारदार मित्राला धक्का बसला.

Exit mobile version