अमिताभ बच्चनचा तो प्रसिद्ध डायलॉग आठवत असेल की, ‘११ मुलकॊंकी पोलीसको डॉन का इंतजार है ‘… १९७० चे दशक म्हणजे अक्षरशः अमिताभ च्या डायलॉग प्रमाणे होते. भारत, नेपाळ, म्यानमार, थायलंड, फ्रान्स, इराण, ग्रीस सह अनेक देशांचे पोलीस बेड्या ठोकण्यासाठी शोभराजचा शोध घेत होते. भारतासह दक्षिण आशियाई देशांमध्ये बिकिनी किलर म्हणूनही ओळखला जाणाऱ्या शोभराजच्या हत्याकांडामुळे सगळ्यांनाच भंडावून सोडले होते. दक्षिण पूर्व आशियातील जवळपास प्रत्येक देशात जाऊन त्याने परदेशी पर्यटकांची शिकार केली. विशेष म्हणजे त्याने भारत, नेपाळ, थायलंड, युरोप आणि अमेरिकेतील मुलींची हत्या केली होती. शोभराजने प्रत्यक्षात किती लोकांची हत्या केली याचे रहस्य अजूनही कायम आहे. चार्ल्स शोभराज याची नुकतीच नेपाळमधील तुरुंगातून तब्बल २० वर्षांनी सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याचा हा जीवनपट पुन्हा एकदा चर्चेत आला.
चार्ल्सचे पूर्ण नाव हत्तचंद भानानी गुरुमुख चार्ल्स शोभराज. चार्ल्सचा जन्म १९४४ मध्ये व्हिएतनाममधील सायगॉन येथे झाला. चार्ल्सची आई व्हिएतनामी आणि वडील भारतीय होते. त्यांची आई वेगळी राहत होती, कारण दोघांचे कधीही लग्न झाले नव्हते, त्यामुळे चार्ल्सच्या भारतीय वडिलांनी त्यांना कधीही दत्तक घेतले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर एक वेळ अशीही आली जेव्हा ते कोणत्याही देशाचे नागरिक नव्हते.त्यावेळी हे शहर जपानी लोकांच्या ताब्यात होते. फ्रेंच सैन्याने चार्ल्सला दत्तक घेऊन त्याला फ्रेंच नागरिकत्व दिले. क्रूरताही नतमस्तक होईल असे कारनामे चार्ल्स शोभराज याने केले होते. खून करणारा शोभराज एक मानसिक विकृती होती. एका मानसशास्त्रीय लेखकाने त्यांच्या पुस्तकात काही गुन्हेगारांचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये चार्ल्स शोभराज यांचेही नाव होते. लहानपणापासूनची निराशा आणि आई-वडिलांबद्दलचा द्वेष चार्ल्स शोभराजसारख्या गुन्हेगारात रूपांतरित होतो असे या पुस्तकात म्हटले आहे.
नेपाळ मध्यवर्ती कारागृहात वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजची तब्बल १९ वर्षानंतर सुटका झाली. नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी चार्ल्स शोभराजला सोडण्याचे आदेश दिले. पण शुक्रवारी चार्ल्स शोभराजची सुटका करण्यात आली. चार्ल्स शोभराज लवकरच त्याच्या मायदेशी म्हणजेच फ्रान्सला परतणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, चार्ल्स शोभराजला गुरुवारी सोडण्यात येणार होते. मात्र तुरुंग प्रशासनाने त्यांची सुटका करण्यास नकार दिला. कारागृह प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्पष्ट असून कोणत्या प्रकरणात त्याची सुटका करण्यास सांगितले याचा उल्लेख नाही, असे म्हटले होते. त्यानंतर शुक्रवारी त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली.
हे ही वाचा :
आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान
आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल
शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना
पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार
तुरुंगातील सुटकेनंतर शोभराज याला फ्रान्सला पाठवण्यात आले असून त्याला आयुष्यभर नेपाळला परत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शोभराज शुक्रवारी रात्री कतार एअरवेजने प्रथम दोहा आणि नंतर पॅरिसला जाणार आहे. काठमांडू-दोहा विमान काठमांडू विमानतळावरून संध्याकाळी ६ वाजता उड्डाण करणार आहे. चार्ल्स शोभराजने १९७० च्या दशकात संपूर्ण आशियामध्ये अनेक खून करून खळबळ उडवली होती आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, त्याची शुक्रवारी नेपाळच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आणि त्याला हद्दपार करण्यात आले. प्रवासाच्या कागदपत्रांवर प्रक्रिया करण्यासाठी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.