१०० कोटी वसुली प्रकरणी दाखल झालेल्या मनी लॉन्डरिंगच्या गुन्हयात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांच्या विरुद्ध ईडीने विशेष ईडी न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक पुरावे, अनेकांचे जबाब जोडण्यात आलेले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. दरम्यान प्रकरणात अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे या दोघांना २५ जून रोजी अटक केली होती.
या दोघांच्या अटकेला ६० दिवस झाले आहेत. ईडी कायद्यात अटकेच्या ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करायचे असते. सोमवारी या दोघांच्या अटकेला ६० दिवस झाले असून ईडीने सोमवारी विशेष ईडी न्यायालयात या दोघांविरुद्ध आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेकांच्या साक्ष, अनेक हॉटेल मालकाची जबाब, सचिन वाजे याचा जबाब आणि काही तांत्रिक पुराव्यासह इतर पुरावे जोडण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!
भाई जगतापांचा काँग्रेसच्याच नितीन राऊत यांना झटका
पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!
अरेरे! अखेर विष पिणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स पाठवून देखील अनिल देशमुख ईडी कार्यालयात एकदाही हजर राहिले नाही. त्यांनी वारंवार आपल्या वकिलामार्फत ईडीला निवेदन पाठवून येण्याचे टाळले आहे.