कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल

भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरोधात एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे

कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल

कॉमेडियन भारती सिंग आणि तिच्या पतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. ड्रग्ज प्रकरणी २०२० मध्ये एनसीबीने भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. या दोघांवर एनसीबीने आता दोनशे पानी आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ड्रग्ज प्रकरणी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाम्पत्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्याच्या विविध कलमांतर्गत सेवनाशी संबंधित कलम २७ आणि गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कलम २८ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच उत्तेजन आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल कलम २९ आणि ८ सी संबंधित कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

२०२० मध्ये बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची प्रकरणे समोर आली होती. एनसीबीने ड्रग प्रकरणात दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. एनसीबीने नोव्हेंबर २०२० मध्ये तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले होते. यावेळी त्याच्या घरातून जवळपास ८६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. यानंतर एनसीबीने या दाम्पत्याला अटक केली होती.

हे ही वाचा:

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी

राज्यात बसणार सायबर गुन्ह्यांना आळा

भारती सिंग एक कॉमेडियन आणि टेलिव्हिजन अँकर आहे. तिचे पती हर्ष लिंबाचिया हे पटकथा लेखक आणि निर्माता आहेत. एनसीबीने हर्ष आणि भारती यांना न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दाम्पत्याला १५ हजार रुपयांची सुरक्षा रक्कम जमा केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेव्हापासून हे दोघेही बाहेर आहेत.

Exit mobile version