अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र

अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र

रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणे आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले.

या आरोपपत्रात १० जणांवर आरोप ठेवण्यात आले असून हे आरोपपत्र तब्बल १० हजार पानांचे आहे. या आरोपपत्रात अनेक साक्षीदार, तांत्रिक पुरावे शिवाय अनेक पुरावे जोडण्यात आले आहेत. त्यात ज्या १० आरोपींवर आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यात १) सचिन वाजे २) रियाजुद्दीन काझी, ३) विनायक शिंदे ४) प्रदीप शर्मा ५) सतीश मोटकर ६) मनीष सोनी ७) संतोष शेलार ८)नरेश गोर ९) आनंद जाधव आणि १०)  सुनील माने यांचा समावेश आहे.

२५ फेब्रुवारी २०२१ला यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला होता. गांवदेवी पोलिस ठाण्यात हा एफआयरआर दाखल करण्यात आला. अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेल्या महिंद्र स्कॉर्पिओ ठेवण्यात आली होती. त्यानंतर विक्रोळी पोलिस ठाण्यात सदर महिंद्र स्कॉर्पिओ हरवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. ५ मार्चला मुंब्रा खाडीतून मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. त्याची अपघाती मृत्यू म्हणून मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हे एफआयआर दाखल झाल्यानंतर या सगळ्या १० जणांविरुद्ध कटकारस्थान रचल्याचे पुरावे समोर आले.

हे ही वाचा:

राज्याचा महसूल गेला कुणीकडे?

दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर

पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक

थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना ‘बेस्ट’ बसेसचा ठेंगा

यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

 

Exit mobile version