अभिनेता साहिल खानसह चार जणांवर मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.
‘मिस्टर इंडिया’ बॉडीबिल्डर मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच ओशिवरा पोलीस त्या चौघांचे जबाब नोंदवणार आहेत. मिस्टर इंडिया व बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटीलला सध्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे. आत्महत्येपूर्वी मनोजने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खानचा उल्लेख त्याने केला होता.
बुधवारी (१५ सप्टेंबर) रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मनोजने झोपेच्या गोळ्या घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. तातडीने मनोजला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. अभिनेता साहिल खानच्या त्रासाला कंटाळून नैराश्येत मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.
हे ही वाचा:
बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली
जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला
…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे
विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!
मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. त्यामुळे आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी अभिनेता साहिल खान प्रयत्न करत असल्याचे आरोप मनोज पाटीलने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला आणि आपल्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टार्गेट करत असून त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याचे मनोज पाटीलने म्हटले आहे.
आपल्या व आपल्या पत्नीमधील असलेल्या वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे कारस्थान साहिल खान करत असल्याचे मनोज पाटीलने म्हटले आहे. त्यामुळे आपला अमेरिकेला जायचा व्हिसा रद्द होऊ शकेल, असंही त्याने म्हटलं आहे. या सर्व गोष्टींचा आपल्या कुटुंबियांना त्रास होत असून साहिल खानवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती मनोज पाटीलने पोलिसांना केली आहे.