25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पेढीच्या अध्यक्षासह १५ जणांविरुद्ध गुन्हा

मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पेढीच्या अध्यक्षासह १५ जणांविरुद्ध गुन्हा

पतपेढीचे सभासद भालचंद्र खातू या व्यवसायिकाने केली होती तक्रार

Google News Follow

Related

लोअर परळ येथील एका सहकारी पतपेढीच्या अध्यक्षासह १५ जणांविरुद्ध ना. म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गैरव्यवहार, खोटी कागदपत्रे सादर करून कर्जवितरीत करणे,सभासदांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारी पतपेढीत गैरव्यवहार आणि मोठ्या प्रमाणात कर्ज घोटाळा तसेच सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार सभासद भालचंद्र खातू या व्यवसायिकाने केला आहे.

 

‘मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित’ या पतपेढीचे सभासद भालचंद्र खातू (६७) यांनी ११ डिसेंबर २०२३ रोजी ना. म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार संबंधित पतपेढीत असलेल्या अध्यक्ष कैलास शेट्ये आणि संचालक मंडळाकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप केला आहे. माहीम येथे राहणारे व्यवसायिक तसेच मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित’ या पतपेढीचे सभासद भालचंद्र खातू यांनी त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी त्यांच्या नावे आणि इतर तीन नातेवाईक यांच्या नावे पतपेढी कडून २०१२ साली प्रत्येकी २५ लाख असे एकूण १ कोटी रुपयांचे दुकान व घरे तारण ठेवून कर्ज घेतले होते.

दरम्यान जुलै २०१४ ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत खातू यांना पतपेढीकडून कर्जवसुलीसाठी एकूण ४ नोटिसा पाठविण्यात आलेल्या होत्या, या नोटीसी नंतर सप्टेंबर २०१५मध्ये कर्जदार खातू यांनी ४५ हजार रुपयांची पतपेढीत भरणा केली. परंतु पूर्वी आलेल्या नोटीस बाबत खातू यांना संशय आल्यामुळे त्यांनी कर्जाचे हप्ते थांबविल्यामुळे खातू यांच्या विरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कायदा कलम १०१ नुसार वसुली अर्ज दाखल करण्यात आला होता.

 

हे ही वाचा:

रतन टाटा यांना धमकी देणारा स्किझोफ्रेनिया’चा रुग्ण

मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच सर्वाधिक विरोध केला

कबुतर जा जा जा…

‘अमेरिकेत खलिस्तानी आंदोलनाला स्थान नाही’

पतपेढीकडून मला संमतीपत्र दाखवले परंतु त्यात मुदत ठेव व इतर योजनाच्या ठेवीची रक्कम खात्यात वर्ग करण्याचे संमतीपत्र आहे, परंतू त्यात रोख रक्कम काढण्याची मी कुठलीही संमती दिलेली नाही, असे खातू यांनी न्यूज डंकाशी बोलताना सांगितले. पतपेढीने माझ्या खात्यातून ३ लाख रुपये रोखीने काढून माझी फसवणूक केली असे खातू यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मी २०१५ मध्ये मी कर्जपोटी भरलेली रक्कम कर्जखात्यात कुठेही दिसून येत नाही असेही खातू यांनी म्हटले आहे.

 

कर्जापोटी भरलेल्या रकमेत तफावत आढळून येत असून मी भरलेल्या कर्जाच्या रकमेत चार लाख ४५ हजार रुपयांची तफावत आढळून येत आहे,त्याच बरोबर माझे खाते व इतर कर्जदार नातलगाच्या खात्यातून पतपेढीने आमची कुणाचीही संमती न घेता, किंवा पूर्वकल्पना न देता २५ लाख १४ हजार रुपए खात्यातून काढून घेत आमची फसवणूक केली, याबाबत संचालक मंडळाकडे चौकशी केली असता संचालक मंडळाने अद्यापपर्यंत काहीही उत्तर दिलेले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

खातू यांनी पुढे असाही आरोप केला की, पतपेढीने बनावट व्हाउचर आणि रिसीट तयार करण्यात आलेल्या असून त्यात व्हाउचर आणि रिसीट वर पतपेढीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, व्यवस्थापिय मंडळाची स्वाक्षरी असल्याचे खातू यांनी आरोप केला आहे. अध्यक्ष कैलास शेट्ये यांनी स्वतःसाठी पतपेढीतून स्वस्त व्याजदराने कर्ज घेतले व त्यांच्या नावावर नसलेली संपत्ती पतपेढीकडे तारण ठेवल्याचा आरोप खातू यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

याप्रकरणी ना. म.जोशी मार्ग पोलीसांनी मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित’ चे अध्यक्ष कैलास शेट्ये,उपाध्यक्ष संचालक यांच्यासह व्यवस्थापकीय मंडळ असे एकूण १५ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०९,४२०,४६५,४६६,४६७,४६८,४७१,४७७(अ) सह ३४ तसेच महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियम १९६० कलम १४७(पी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा