दिल्लीमध्ये वाल्मिकी जयंतीदरम्यान गोंधळ; मशिदीजवळ लाठ्याकाठ्यांनी हल्ला

उत्तर पूर्व दिल्लीमधील नंद नगरीमध्ये वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ

दिल्लीमध्ये वाल्मिकी जयंतीदरम्यान गोंधळ; मशिदीजवळ लाठ्याकाठ्यांनी हल्ला

उत्तर पूर्व दिल्लीमधील नंद नगरीमध्ये शनिवारी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ झाल्यामुळे वातावरण बिघडले. मिरवणुकीत सहभागी झालेले काही तरुण शॉर्टकट घेण्यासाठी म्हणून नंदनगरीतील ई-ब्लॉक मशिदीजवळ पोहोचले. हे तरुण मशिदीजवळून जात असताना धार्मिक नारेबाजी करत होते. मशिदीजवळ उपस्थित असलेल्या काही जणांनी त्यांना धार्मिक नारेबाजी देण्यापासून रोखले असता, वाद निर्माण झाला आणि घटनास्थळी गर्दी जमली.

दुचाकीवर स्वार असलेल्या या तरुणांना तेथील जमावाने धक्काबुक्की केली. यात दोन तरुण जखमी झाले. जमावाने या तरुणांच्या मोटारसायकलीचीही नासधूस केली. जखमींनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सद्यस्थितीत पोलिस आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वाल्मिकी जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जात होती. त्यावेळी तिथे मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

याच मिरवणुकीत सहभागी झालेले अंकित आणि त्याचे मित्र मोटारसायकलवरून नंदनगरीत पोहोचले होते. मिरवणूक याआधीच ठरवलेल्या मार्गावरून जात होती. मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक पुढे जात होती. या दरम्यान अंकित आणि त्याचे मित्र मिरवणुकीपासून अर्धा किमी दूर होते. त्यांनी मिरवणुकीपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी ई-ब्लॉकचा मशिदीकडचा रस्ता पकडला.

हे ही वाचा:

गुगल मॅपकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता

देशासाठी घातक विचारसरणीला विरोध करण्यासाठी केले केरळमध्ये स्फोट

भारत अभेद्य, इंग्लंडला नमवून सलग सहावा विजय

रोहित, शार्दुलचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे ‘ते’ स्वप्न झाले पूर्ण

स्थानिकांनी केलेल्या आरोपानुसार, सुमारे २० ते २५ दुचाकीस्वार मशिदीजवळून जात नारेबाजी करत होते. त्यांना असे करण्यापासून रोखले असता वाद झाला. जमावाने त्यांना परत पाठवले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यात अंकितसह त्याचा एक मित्र जखमी झाला. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. घटनेबाबत कळताच पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Exit mobile version