चंदीगड ग्रेनेड स्फोट: दिल्लीतून दुसऱ्या आरोपीला अटक !

पंजाब पोलिसांची कारवाई

चंदीगड ग्रेनेड स्फोट: दिल्लीतून दुसऱ्या आरोपीला अटक !

चंदीगड शहरात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर ग्रेनेड स्फोट प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी केंद्रीय एजन्सींच्या मदतीने दुसरा आरोपी विशाल मसिह याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

डीजीपी पंजाब पोलिसांनी ट्वीटरवर ही माहिती दिली. ट्वीटरवर पोस्टनुसार, चंदीगड ग्रेनेड स्फोटानंतर ७२ तासांच्या आत पंजाब पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या समन्वयाने स्फोटातील दुसऱ्या गुन्हेगाराला अटक केली आहे.  ११.०९.२०२४ रोजी, दोन संशयितांनी चंडीगडमधील सेक्टर १० मध्ये ग्रेनेड स्फोट घडवून आणला होता. तत्परतेने कारवाई करत पंजाब  पोलिसांनी १३.०९.२०२४ रोजी एक आरोपी रोहन मसिहला पकडले होते.

विविध स्रोतांद्वारे या प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल मसिह याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. विसाल मसिह हा पंजाबमधील गुरुदासपूरच्या बटाला येथील रायमल गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, असे डीजीपी पंजाब पोलिसांनी ट्वीटरवर सांगितले.

हे ही वाचा : 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डॅलसमध्ये डल्ला! हीच का काँग्रेसची लोकशाही?

विरोधक रसातळाला! मोदी गेले आरतीला चैन पडेना आम्हाला!

अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी ठाकरे सज्ज

बीफ कटलेट आणि अपचनाचे ढेकर

दरम्यान, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर ग्रेनेड स्फोटाची घटना बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता घडली होती. या स्फोटाच्या प्रभावामुळे खिडक्या आणि फुलांच्या भांडींचे नुकसान झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Exit mobile version