भावी महिला पोलीसाला सोनसाखळी चोराचा हिसका

भावी महिला पोलीसाला सोनसाखळी चोराचा हिसका

ऍक्टिव्हा मोटारसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यानी एका भावी महिला पोलीसाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केल्याची घटना माटुंगा येथे घडली आहे. ही भावी महिला पोलीस भरतीसाठी सराव करीत असताना हा प्रकार घडला आहे.

दीपाली हजारे असे भावी महिला पोलीसाचे नाव आहे. दादर नायगाव येथे राहणाऱ्या दीपाली या पोलीस दलात भरतीसाठी दररोज सराव करण्यासाठी माटुंगा पाच गार्डन या ठिकाणी सकाळी येत असतात. बुधवारी सकाळी दीपाली या पाच गार्डन माटुंगा येथून रनिंगचा सराव करीत असताना असतांना पाठीमागून एक्टिव्हा मोटरसायकल वरून आलेल्या दोन सोनसाखळी चोरांपैकी मागे बसलेल्या एकाने दीपाली यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळेच हा दुर्दैवी निर्णय

…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही वेळासाठी गोंधळलेल्या दीपाली यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणात माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनसाखळी चोरांचा शोध सुरू केला आहे.

लॉकडाऊन नंतर मुंबईत जागोजागी नाकाबंदी, बंदोबस्त असून देखील सोनसाखळी चोरांना पोलिसांचे भय उरलेले नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version