मुंबईतील सेलिब्रिटिजच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याचा फोन

पोलिसांनी अज्ञात फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

मुंबईतील सेलिब्रिटिजच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याचा फोन

एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस कंट्रोलला फोन करून मुंबईतील प्रसिद्ध लोकांच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे. ज्याने फोन केला त्याचा माग काढण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, सूत्रांनी सांगितले की कॉलरने दावा केला की उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ स्फोट होईल. याशिवाय बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या घरीही स्फोट होणार असल्याचे कॉलरने सांगितले.

या फोननंतर नागपूर पोलीस नियंत्रणाने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलीस कॉलरचा माग काढण्यात गुंतले आहेत. या फोन करणाऱ्या व्यक्तीने असेही म्हटले आहे की, दहशतवादी हल्ले करण्यासाठी शस्त्रांनी सुसज्ज असे २५ जण मुंबईतील दादरला पोहोचले आहेत. अर्थात, याबाबत अद्याप मुंबई पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

हे ही वाचा:

असदुद्दीन ओवैसी यांच्या व्याह्याने केली आत्महत्या

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे राजीनामे

देशभरात गाजत असलेल्या उमेश पाल हत्येचा कट ‘मुस्लिम होस्टेल’मध्ये शिजला…

कर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार

नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र असा कॉल आल्याचे मान्य केले आहे. आज (मंगळवारी) दुपारी १ वाजून ०२ मिनिट वाजता ११२ या क्रमांकावर कॉल आला होता, असे पोलिसांनी म्हटले आहे. अशा प्रकारचे अनेक फोन पोलिसांकडे येत असतात, त्याची शहानिशाही केली जाते. मात्र या फोनच्या माध्यमातून सेलिब्रिटीजची घरे लक्ष्य असल्याचे किंवा हल्ला करण्यासाठी मुंबईत काही लोक आल्याची खबर देण्यात आल्यामुळे त्याचे गांभीर्य वाढले आहे.

Exit mobile version