पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला

पाकिस्तानकडून मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला

पाकिस्तानकडून मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. आज सकाळी पाकिस्तानकडून भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला सुरक्षा दलाकडून चोख उत्तर देण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे.

आज सकाळी अर्निया सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांवर पाकिस्तानी जवानांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

बेंगळुरूतील आयटी कर्मचाऱ्यांच्या कार गेल्या वाहून, ट्रॅक्टर आला धावून

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम अधिक तीव्र केली होती. दरम्यान अनेक दहशतवाद्यांचा खात्मा देखील होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी शस्त्रात्रदेखील जप्त केले होते.

Exit mobile version