राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने समन्स बजावले असून सीबीआयकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. पण सीबीआयकडून कुंटे आणि पांडे यांना कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे राहायचं, याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
अनिल देशमुख प्रकरणात साक्षीसाठी या दोन्ही अधिकाऱ्यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. पण संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अधिकाऱ्यांनी सीबीआयसोबत चर्चा केली होती. त्यामुळे सीबीआयला जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात येण्याची विनंती दोन्ही अधिकाऱ्यांनी केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसुली प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्याच तपासाचा एक भाग म्हणून आता सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.
हे ही वाचा:
‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर
फिनिक्स मॉलसमोरील उड्डाणपुलावर दोन दुचाकीस्वार झाले ठार…
महिला निदर्शकांबाबत तालिबानने काय केले?
शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात
या समन्सवर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणतात, “हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोघांनीही सीबीआयला अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी घोटाळा प्रकरणाचा तपास करायला सांगितलं आहे. या तपासादरम्यान वेगवेगळ्या खात्याशी संबंधित सर्वांनी सहकार्य करुन माहिती द्यावी. समन्स बजावला याचा अर्थ ती व्यक्ती गुन्हेगार असते असं ठरत नाही. संबंधित व्यक्तीकडे जी माहिती आहे ती द्यावी लागते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील असे सांगत देशमुख यांनी राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल, असे देशमुख यांचे म्हणणे होते. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे.