बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या विरोधात सीबीआयचे दोन गुन्हे दाखल

बँकांची ५९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या विरोधात सीबीआयचे दोन गुन्हे दाखल

बँकांची ५९० कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डीएसके अर्थात दीपक कुलकर्णी यांच्यावर सीबीआयने २ गुन्हे दाखल केले आहेत. कुलकर्णी यांच्याबरोबरच संचालक मंडळातील काही जणांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँक,सेंट्रल बँक यासह आणखी काही बँकांची फसवणूक केल्याचा दीपक कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, विजया बँक यांच्याकडून एसके यांच्या कंपनीला जवळपास ६५० कोटींचे कर्ज देण्यात आले होते. या एकूण कर्जापैकी ४३३ कोटी रुयांचे कर्ज कुलकर्णी यांनी थकवले आहे. त्यामुळे बँकांची फसवणूक केल्या प्रकरणी डीएसके यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीएसके यांच्या डी.एस.के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लिमिटेड या कंपनीने १५६ कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिझायनिंग, गेमिंग, ॲनिमेशनचे प्रशिक्षण देण्यात हि कंपनी कार्यरत होती. कंपनीच्या उत्पन्नापैकी ६० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करण्यात आली असे कंपनीने आपल्या ताळेबंदात नमूद केलेआहे. कंपनीला ज्या उद्देशासाठी कर्ज दिले होते त्याऐवजी कंपनीने कर्जातून मिळालेली रक्कम मूळ कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरली असल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

अमित शहा आज मुंबईत येणार, पोलिसांचे सतर्कतेचे आदेश

…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!

ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

डीएसके म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी यांनी १९७० मध्ये डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सची स्थापना केली . या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. २०१४ पर्यंत सगळे सुरळीत होते. नंतर मात्र गाडी घसरली. गुंतवणूकदारांचे पैसे तसेच कर्मचाऱ्यांचे पगार थकवने अशा विविध कारणामुळे डीएसके वादाच्या भोवऱ्यात सापडले.

Exit mobile version