24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी संदेशखालीत सीबीआयकडून छापेमारी

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी संदेशखालीत सीबीआयकडून छापेमारी

छाप्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी सीबीआयकडून अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. सीबीआयने या छाप्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त केली आहेत. यापूर्वी संदेशखाली प्रकरणी सीबीआयने पहिली एफआयआर नोंदवली होती. सीबीआयने ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला होता. या एफआयआरमध्ये पाच जणांची नावे आहेत तर बाकीचे अज्ञात आहेत.

महिलांवरील अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या १० सदस्यीय पथकाने गेल्या आठवड्यात संदेशखालीला भेट दिली होती. यावेळी पथकाने पीडित कुटुंबीय आणि महिलांशी बोलून त्यांचे जबाब नोंदवले. यासोबतच सीबीआयचे एक पथक संदेशखाली पोलीस ठाण्यात पोहोचले, तेथे उपस्थित पोलिसांकडून तपास अहवाल मागविण्यात आला.

पश्चिम बंगालमधील शिधावाटपातील सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी शहाजहान शेख यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक ५ जानेवारीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तेव्हा त्यांच्या टोळ्यांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. २०० हून अधिक स्थानिक लोकांनी अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या निमलष्करी दलाच्या वाहनांना घेराव घातला होता. शिवाय जमावाने अधिकाऱ्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी राजकुमार राम, सोमनाथ दत्त आणि अंकुर गुप्ता जखमी झाले.

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली मात्र, शाहजहान शेख अनेक दिवस फरार होता. शाहजहान हा माजी अन्न मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांचा निकटवर्ती असल्याच्या चर्चा आहेत. ईडी पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर संदेशखालीचे नाव चर्चेत आले जेव्हा तेथील महिलांनी शाहजहान शेख याच्यावर जमीन बळकावल्याचा आणि त्याच्या साथीदारांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या प्रकरणी भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता सरकारचा तीव्र निषेध केला.

हे ही वाचा:

बोटाला शाई दाखवा आणि डोकं हलकं करा

‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’

पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक

दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!

दरम्यान, संदेशखालीमधील सर्व आरोपींना अटक करण्यासाठी देशभरातून ममता सरकारवर दबाव आणण्यात आला. बंगाल पोलिसांनी त्याच्या गुंडांना अटक केली मात्र शहाजहान शेखला अटक झाली नव्हती. कोलकाता उच्च न्यायालयाने शहाजहानच्या अटकेचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत फेब्रुवारीच्या अखेरीस त्याला अटक केली. यानंतर संदेशखाली येथील पाच महिलांसह हिंसाचारातील ११ पीडितांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा