केंद्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई देशभरातून समोर आली आहे. मंगळवार, ५ ऑक्टोबरला तपास यंत्रणेने देशातील शंभरहून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. इंटरपोल, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांसारख्या एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने कारवाई केली आहे.
देशातील जवळपास ११५ राज्यांमध्ये सायबर गुनेहगारांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत सीबीआयने छापेमारी केली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांच्या सहकार्याने ‘ऑपरेशन चक्र’ अंतर्गत शोध मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सीबीआयने ८७ ठिकाणांचा, तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी २८ ठिकाणावर छापेमारी केली आहे.
दिल्लीच्या पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तसेच राजस्थानमधील राजसमंदमध्ये एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. त्याचवेळी पुणे आणि अहमदाबादमध्ये अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरचाही पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये तीनशेहुन अधिक संशयितांची चौकशी सुरु आहे. यासोबतच अंदमान आणि निकोबारमध्ये चार, दिल्लीतील पाच, चंदीगडमध्ये तीन, पंजाब-कर्नाटक आणि आसाममध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी शोधमोहीम सुरु होती.
हे ही वाचा
सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू
दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी
२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले
दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी
अमेरिकेत सायबर गुन्हे करत असल्याची तक्रार इंटरपोलमार्फत एफबीआयकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे सीबीआयनेही ऑपरेशन चक्राअंतर्गत या कारवाईची माहिती एफबीआयला दिली आहे. सायबर गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सीबीआयने नुकतेच सोशल मीडियावर खाते तयार केले आहे.