एनबीसीसीचे माजी अधिकारी डीके मित्तल यांच्या घरातून दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त

एनबीसीसीचे माजी अधिकारी डीके मित्तल यांच्या घरातून दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे माजी अधिकारी डीके मित्तल अडचणीत सापडले आहेत. मित्तल यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. शुक्रवार, ८ जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या सीबीआयच्या छाप्यांमध्ये आयकर विभागसुद्धा सामील झाले आहे. डीके मित्तल यांच्या घरातून आतापर्यंत दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सीबीआयने डीके मित्तल यांची घरी मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने सापडल्याबद्दल चौकशी केली. अनेक प्रश्नांनंतरही डीके मित्तल यांना उत्तर देता आले नाही, तेव्हा याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली. त्यानंतर मित्तल यांच्या घरात कोट्यवधींची रोकड आणि दागिने मिळाल्यानंतर आयकर विभागाने त्यांची चौकशी सुरु केली आहे. मोठी रोकड मिळाल्यानंतर रक्कम मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा

बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या छापेमारीत मिळाली ४० कोटींची चित्रे आणि शिल्पकृती

“इस्लाम, ख्रिश्चनांचा अपमान अपमान; हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं काय?”

शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर

डीके मित्तल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सीबीआय आधीच या प्रकरणाचा तपास करत होती. या संदर्भात सीबीआयने शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला होता. छाप्यादरम्यान तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे.

Exit mobile version