बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये टाकल्या धाडी

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

सीबीआयच्या पथकाने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील सुमारे ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. कोलकाता, दार्जिलिंग आणि सिलीगुडी येथे कारवाई झाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याप्रकरणी सरकारी अधिकाऱ्यांसह २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, या तपासादरम्यान गंगटोकच्या पासपोर्ट ऑफीसमधून गौतम कुमार यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. त्यांना १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात पकडले आहे. बनावट पासपोर्ट बनवण्याच्या आरोपाखाली सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्ती मिळून २४ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लश्कर-ए-तैयबाच्या मॉड्यूलचा भंडाफोड

भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, १६ अधिकाऱ्यांसहित २४ असे लोक आहेत जे लाच घेऊन भारतीय नसलेल्या व्यक्तींना खोट्या कागदपत्रांच्या आधारे नकली पासपोर्ट बनवून देत होते. आता सीबीआय कोलकाता, सिलीगुडी, गंगटोक आणि आणखी काही ठिकाणी तपास करत आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने एक व्यक्ती अशा नेटवर्कचा भाग आहे जे नेटवर्क नकली पासपोर्ट बनवून देते. आता यामध्ये आणखी काही संशयित असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Exit mobile version