संदेशखालीमध्ये स्थानिक रहिवाशाच्या बंद घरात शस्त्रे, क्रूड बॉम्ब इत्यादींचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी सकाळपासून येथे छापे टाकले. सीबीआयने घराचा मजला खोदण्यासाठी उपकरणेही आणली.
रिपब्लिक बांग्लाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही दृश्यांत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याचे दिसते आहे. संदेशखाली येथे जमिनीखालून क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे वाहिनीने म्हटले आहे.
‘संदेशखालीमध्ये शस्त्रास्त्रे सापडत आहेत. शेख शहाजहानने येथे कायम भीतीचे साम्राज्य पसरवले आहे. दहशतीचे जाळे उद्ध्वस्त करण्याची आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याची हीच वेळ आहे. यापुढे धमक्या सहन केल्या जाणार नाहीत. हिंसाचार सहन केला जाणार नाही,’ अशी प्रतिक्रिया भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ट्विटद्वारे दिली.
हे ही वाचा:
नैनीतालमध्ये वणवे पेटून जंगलांचे नुकसान; आयटीआय भवन जळालं
‘अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देऊन स्वार्थाला प्राधान्य दिले’
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!
मुकेश दलाल यांच्या विजयामुळे काँग्रेसचा तिळपापड, निलेश कुंभानी सहा वर्षांसाठी निलंबित!
अबू तालेब नावाच्या व्यक्तीच्या घरातून ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, ज्यात आयात केलेल्या शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. आरोपीने त्याच्या घरी सापडलेल्या बंकरमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवल्या होत्या का, याचा तपास अधिकारी करत आहेत.