22 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरक्राईमनामासीबीआयकडून मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एफआयआर

सीबीआयकडून मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एफआयआर

मणिपूर पोलिसांकडून तपास हाती घेत नवीन एफआयआरची नोंद

Google News Follow

Related

मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मे महिन्यात घडला होता. याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी म्हणजेच घटनेच्या महिन्याभरानंतर व्हायरल झाला. त्यानंतर सर्वच स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला होता.

मणिपूरमध्ये जमावाकडून दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी सीबीआय करेल, अशी माहिती गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, केंद्राने मणिपूर सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे.

सीबीआयने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार मणिपूर पोलिसांकडून तपास हाती घेत नवीन एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरमध्ये कलम १५३ ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४ आणि ३६४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना आतापर्यंत यश मिळाले असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एकाकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ज्याचा उपयोग दोन महिलांचा विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी केला जात होता, असा संशय आहे.

हे ही वाचा:

छोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात अडकलेल्या ३६ मच्छिमारांची भारतीय नौदलाकडून सुटका

महिलेलेची धिंड काढण्याची ही घटना ४ मे रोजी घडली होती. घटनेच्या दोन महिन्यांनंतर १९ जुलै रोजी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा