एका प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चार आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीने स्वतः सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी असल्याचा खोटा दावा केला होता. या खोट्या प्रकरणात या आरोपीला इतर चार जणांनी साथ देत लोकांना फसवले होते.
आठ ते दहा दिवसांत सीबीआयने चार आरोपींना अटक केली आहे. १५ जुलै रोजी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे पाच आरोपी लातूर, मुंबई, नवी दिल्ली, गाझियाबाद, बेळगाव येथील रहिवासी आहेत. लातूरचा रहिवासी असलेला कमलाकर प्रेमकुमार बंडगर याने सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी असल्याचा बनाव केला. या प्रकरणात त्याला महेंद्र पाल अरोरा,अभिषेक बुरा, रवींद्र विठ्ठल नाईक आणि मोहम्मद एजाज खान या आरोपींनी साथ दिली होती.
सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत यांनी लोकांना राज्यसभेतील जागांची, राज्यपाल म्हणून नियुक्ती, केंद्र सरकारच्या मंत्रालयांतर्गत विविध सरकारी संस्थांमध्ये अध्यक्षपदी नियुक्ती करून देतो अशी खोटी माहिती देत पैसे उकळले.
हे ही वाचा:
तेजस्वी सूर्याने केला मोदींचा लाल चौकातील ‘तो’ फोटो शेअर
मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान
पाचव्या मजल्यावरून चिमुरडी पडली! तिला कुणी झेलले?
पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी
त्यानंतर १५ जुलै रोजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींचा दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह सात ठिकाणी शोध घेण्यात आला. या प्रकरणातील पाच पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, मोहम्मद एजाज खान या आरोपीला अजून अटक झालेली नाही. अटक आरोपींना २२ आणि २३ जुलैला दिल्ली येथील सक्षम न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या आरोपी जामिनावर आहेत.