सहा वेगवेगळ्या प्रकरणात सीबीआयने सीमाशुल्क विभागाच्या पाच अधीक्षकांना अटक केली असून दोन अन्य व्यक्तीही त्यांच्या ताब्यात आहेत.
सीमाशुक्ल कायद्याच्या अंतर्गत बदल्यांबाबत ज्या तरतुदी आहेत त्यांचा आपल्या पोस्टिंगदरम्यान गैरवापर केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. त्याअंतर्गत अशा सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये सीबीआयने सीमाशुल्क विभागाच्या सहा अधीक्षकांना आणि दोन व्यक्तींना अटक केली आहे. हे सगळे आरोपी या कटकारस्थानांमध्ये सहभागी होते, असा आरोप आहे.
सीबीआयने म्हटले आहे की, काही व्यापारी लोकांनी विविध लोकांचे पासपोर्ट वापरले, जे लोक परदेशात स्थायिक आहेत. विशेषतः आखाती देशात गेली दोन वर्षे राहात असलेल्या लोकांचे हे पासपोर्ट होते. त्या माध्यमातून विविध वस्तू तिथून आयात केल्या जात होत्या. त्यात घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर अज्ञात वस्तूंचा समावेश होता. या सगळ्यांचे मूल्य कमी करून त्यांची आयात केली जात होती.
हे ही वाचा:
रशियन एस ४०० वर भारी होणारे भारताने विकसित केली हवाई संरक्षण यंत्रणा
अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…
महिलांनो, आजपासून एसटीत निम्म्या तिकीटाने प्रवास करा!
राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान
या वस्तू आणताना ज्या व्यक्तीचा पासपोर्ट वापरला जात होता, त्याच्या नावावर त्या वस्तू आणल्या जात आहेत, असे दाखविण्यात येत होते पण प्रत्यक्षात ज्या व्यक्ती परदेशात स्थायिक आहेत त्यांच्यासाठी या वस्तूंची आयात केली जात असे. ज्याचा पासपोर्ट वापरला जात असे त्याला प्रत्येकी १५ हजार रुपये दिले जात असल्याचाही आरोप आहे. हे सगळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही व्यापारी मंडळी करत असत. हे सगळे सीमाशुल्क अधिकारी या वस्तूंची तपासणी करून त्यांना भारतात आणण्यास परवानगी देत असत. त्यासाठी त्यांना पैसे मिळत. ही रक्कम जवळपास २.३८ कोटींच्या घरात होती. त्या रकमेच्या आधारावर या वस्तूंना सहज भारतात आणणे शक्य होत असे.
या आरोपींच्या विविध १९ ठिकाणांवर सीबीआयने छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, गाझियाबाद, जयपूर, मोतीहारी (बिहार), कुरुक्षेत्र, रोहतक याठिकाणी ही छापेमारी झाली. त्यात अनेक कागदपत्रे व अनेक गोष्टी सीबीआयला मिळाल्या आहेत.
या अटक केलेल्या आरोपींना अलिबाग येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले आणि त्यांना पाच दिवसांची रिमांड देण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे कुमार आलोक, केशव पांधी, हेमंत गेथे, ब्रिजेश कुमार व दिनेश कुमार अशी आहेत. इतर दोन व्यक्ती ज्यांना अटक करण्यात आली आहे त्या दीपक पारेख, आशीष कामदार आहेत.