राजस्थानमधील अलवर येथील एका मंदिरात चोरीची घटना घडली आहे.मात्र, चोरी करण्यापूर्वी चोरट्याने मंदिरात असे काही केले ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे.
१६ मार्च रोजी ही चोरीची घटना घडली. राजस्थानमधील अलवर येथील आदर्श नगरमध्ये असलेल्या राम सरकार हनुमान मंदिरात ही चोरी झाली.चोरट्याने मंदिराच्या दानपेटीतील पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरी केले अन पसार झाला.अखेर पोलिसांनी त्याला पकडले.गोपेश शर्मा (३७) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी गोपेश शर्मा शनिवारी(१६ मार्च) राम सरकार हनुमान मंदिरात कुलूप तोडून प्रवेश करतो.त्यानंतर तो चोरी करण्यापूर्वी देवाची पूजा करतो. पूजाअर्चा करून तो मंदिरात ठेवलेले चांदीचे दागिने, देवावर ठेवलेले छत्र, दानपेटीत ठेवलेले पैसे घेऊन पळून जातो.दुसऱ्या दिवशी मंदिराचे पुजारी तेथे पोहोचले तेव्हा त्यांना वस्तू गायब असल्याचे आढळून आले.
हे ही वाचा:
एसबीआयला निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील उघड करण्याचे निर्देश
ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून उकळली खंडणी
‘भारतात अशांतता निर्माण करण्याचा भारतविरोधी शक्तींचा प्रयत्न’
तेलंगणाच्या राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन यांचा राजीनामा!
त्यानंतर चोरीचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मंदिरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे प्रकरण उघडकीस आले.फुटेजच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी गोपेश शर्माला शोधून काढले.आरोपी पटेल नगर, अलवर येथील रहिवासी असून त्याला अटक करून चौकशी केली जात आहे. चौकशीत आरोपी गोपेशने यापूर्वीही असे प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, तो फक्त मंदिरांना टार्गेट करायचा. चोरीच्या आधी तो मंदिराची रेकी करायचा, अनेक दिवस तिथे पूजा करायचा आणि मग एके दिवशी रात्री पुजारी निघून गेल्यावर तो मंदिरात घुसून चोरी करायचा.दरम्यान, पोलिस सध्या त्याच्या जुन्या रेकॉर्डचा शोध घेत असून त्याच्या तपासादरम्यान अन्य घटनाही उघडकीस येण्याची शक्यता आहे.