शिवराज्याभिषेकाच्या दिवशी सायंकाळी बजरंग दलातील गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली की मार्केट यार्डातील जनावर बाजारात एक अशोक लेलँड पिकअप गाडी जनावरे भरून कत्तलीसाठी जाणार आहे .सदर घटनेची माहिती घेण्याकरिता गोरक्षकांनी कुठलाही वेळ न घालवता सदर ठिकाणी जाऊन MH 13 AN 8390 या गाडीची चौकशी केली असता सदर गाडीचा चालक गाडी सोडून पळून गेला व सदर जनावरे कत्तलीसाठी जाणार आहे ते स्पष्ट झालं व गोरक्षकांनी सदर माहिती पोलिसांना पोलीस कंट्रोल रूम द्वारे माहिती कळविली.गाडी पोलिसांच्या मदतीने जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली व कायदेशीर कारवाई करण्यात आली.
शिवराज्याभिषेक दिनी संध्याकाळी गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली की, सोलापुरात एक गाडी वासरांनी भरून मार्केट यार्ड मार्ग सोलापुरात दाखल होणार आहे. ही खबर लागताच गोरक्षकांनी पुणे नाक्यावरील पूलावर ट्रॅप लावला असता काही वेळातच सदर गाडी MH 13 AN 5986 पिकअप गाडी गोरक्षकाद्वारे पुणे नाक्यावरील पुलावर पकडण्यात आली. सदर गाडीत ३६ गोवंश (वासरे) होती. सदर गाडीतील सर्व वासरांचे तोंड अधिक क्रूरपणे चिकटपट्टीने बांधण्यात आले होते . सदर कारवाईची नोंद फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.
सदर दोन्ही कारवाईतील सर्व गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आले. सदर कारवाई करण्याकरिता जोडभावी पेठ पोलीस स्टेशन व फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे व तसेच अहिंसा गोशाळेचे विशेष सहकार्य लाभले.
हे ही वाचा:
‘काँग्रेसने बाऊ करण्याऐवजी ईडीच्या कारवाईला समोर जावं’
… आणि जवानांनी पर्यटकांची केली सुटका
सदाभाऊ खोतांची विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार
राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव
सदर कारवाई करण्याकरिता विजय यादव(मानद पशू कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), प्रशांत परदेशी(मानद पशूकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), योगीराज जडगोणार(मानद पशूकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), पवनकुमार कोमटी(मानद पशूकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), सिद्धेश्वर पाटील(अखिल भारत कृषी गोसेवा संघ दक्षिण सोलापूर शहराध्यक्ष), गोरक्षक सुरज भोसले,पवन बल्ला, संतोष भोसले,रवी कवचाळे, राजू राठोड आदि गोरक्षकांचे सहकार्य लाभले.