विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने एका गोवंशाची कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे गोरक्षकांनी योजना करून ह्या टोळीच्या हातून गोमासांचे रक्षण केले आहे.
दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या गोरक्षकांना एक टोळी गोवंशाची कत्तल करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गोरक्षकांना एक गाडी विजापूर वेस येथून गुलबर्गा येथे गोमांस घेऊन जाणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने अक्कलकोट रोड येथे सापळा रचला. आणि रात्री ११ च्या सुमारास एक संशयित गाडी त्यांच्या नजरेस पडली. त्या गाडीचा गोरक्षांनी आणि पोलिसांनी पाठलाग करत त्या गाडीला गांधीनगर येथे अडवण्यात त्यांना यश आले.
गाडीत मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करून ही गाडी गुलबर्गा येथे गोमास घेऊन जात होती. मात्र गोरक्षकांनी आणि पोलिसांनी ह्या टोळीची योजना अयशस्वी करत गोमांसाचे पकडून दिले आहे. ही गाडी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक
कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक!
‘गली बॉय’ फेम रॅपर धर्मेश परमारचे निधन
सदर कारवाई यशस्वी करण्याकरिता जगदंब प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विजय यादव, बजरंग दल चे गोसेवा जिल्हाध्यक्ष सिद्राम चरकुपल्ली, शहराध्यक्ष योगीराज जडगोणार ,गोरक्षा प्रमुख प्रतीक्षित परदेशी गोरक्षक राजन सिरसिल्ला, प्रशांत परदेशी, सूरज भोसले, अविनाश कैय्यावाले आदि गोरक्षकाचा सहभाग होता. त्याशिवाय कारवाई यशस्वी करण्याकरिता एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर साहेब व तसेच पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता.