नागपूर पोलिसांनी इतवारी परिसरातील अनाज बाजारातील दोन इमारतींवर छापेमारी केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ८४ लाखांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. खाजगी लॉकर्समध्ये साठवलेला हा सगळा पैसा हवालाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी नागपूरमधील इतवारी परिसरात दोन इमारतींवर छापेमारी करून ८४ लाखांची रोकड जप्त केली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी या संपूर्ण कारवाईची आणि आणखी ९५० लॉकर्स तिथे असल्याची माहिती आयकर विभागाला दिली आहे. आयकर विभागाने या दोनही इमारतींमध्ये तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
कोरोनाचा नवा व्हेरियन्ट ऑमिक्रॉनची चर्चा
नव्या व्हेरियंटचा, नवी नियमावली
‘अर्जुन खोतकर मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी १०० एकर जागा हडपण्याच्या प्रयत्नात’
किशोर खोखो संघांच्या कर्णधारपदी सोत्या वळवी आणि सानिका चाफे!!.
दोन इमारतींमध्ये छापे मारले तेव्हा कारवाईदरम्यान ४४ लाखांची रोकड सापडली. तसेच तिथे हवालाचा व्यवसाय चालत असल्याची माहिती समजली. काही मशीन्स सापडल्या असून त्याच इमारतीच्या शेजारील इमारतीत ४० लाखांची रोकड सापडली. तसेच मुख्य इमारतीमध्ये ९०० ते ९५० खासगी लॉकर्स असून त्यात अजून रोकड असण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटले. कारवाई दरम्यान काही लोकांना ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.