लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

आयकर विभागाची मोठी कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

देशात सध्या लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीचे सहा टप्पे पार यशस्वी पडले असून आता अंतिम टप्पा शनिवार, १ जून रोजी पार पडेल. निवडणुकी दरम्यान काहीही गोंधळ होऊ नये यासाठी निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते. अशातच आयकर विभागानेही या काळात मोठी कारवाई करत गैरप्रकारांना आळा घातला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयकर विभागाने मोठी कामगिरी केली आहे. या दरम्यानच्या काळात विक्रमी ११०० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा १८२ टक्क्यांनी अधिक आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गुरूवार ३० मे अखेरीस विभागाने अंदाजे ११०० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. ज्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या ३९० कोटी रुपयांच्या तुलनेत १८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले

ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ; ३४ आरोपांमध्ये दोषी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याच्या दिवशी १६ मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून, आयकर विभाग मतदारांवर संभाव्य प्रभाव टाकू शकणाऱ्या बेहिशेबी रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवून होता. माहितीनुसार, दिल्ली आणि कर्नाटक सर्वाधिक जप्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. प्रत्येक राज्यात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.

Exit mobile version