मुंबईत हवेत वाढलेल्या प्रदूषणाची दखल खुद्द उच्च न्यायालयाने घेतली आहे.दिवाळीच्या सणात फटाके फोडण्यावर न्यायालयाने वेळेचे निर्बंध लावले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली असून मागील तीन दिवसात मुंबईत ८०६ जणांविरुद्ध कारवाई करून ७८४ गुन्हे दाखल केले आहे. सर्वात अधिक गुन्हे पश्चिम आणि उत्तर उपनगरात करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईतील हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता वाढल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने खुद्द त्याची दखल घेतली आहे. दिवाळीच्या सणात मुंबईत होणाऱ्या फटाक्याच्या आतिषबाजी मुळे हवेतील प्रदूषण वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे उच्च न्यायालयाने दिवाळी सणात फटाके फोडण्यावर वेळेचे निर्बंध टाकले आहे, रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यात यावे असा आदेश उच्च न्यायालयाने काढला होता. मुंबई पोलिसांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येत असून पोलिसां कडून मुंबईत शुक्रवार पासून कारवाईला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेमध्ये पॅलिस्टिनी समर्थक विद्यार्थ्याकडून वर्गामध्ये अडथळा!
दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ९९९ वर
पाकिस्तानात जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याला ठोकलं
आरक्षणासाठी मराठा तरुणाची आत्महत्या
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मुंबईत मागील तीन दिवसात मुंबई पोलिसांकडून ८०६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईतील पश्चिम आणि उत्तर उपनगरात सर्वात अधिक कारवाई करण्यात आलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्या स्टॉल धारकाविरुद्ध १००पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आले आहे. ही कारवाई पुढे ही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.