मागील दोन दिवसापासून समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या मारहाणीच्या व्हिडीओ प्रकरणी अखेर वांद्रे रेल्वे पोलिसांनी १० ते १५ अनोळखी व्यक्तीविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हायरल व्हिडिओ हा २१ जुलै रोजीचा असून मारहाणीची घटना ही वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात घडली होती. या मारहाणीच्या व्हिडीओला काही कट्टरपंथीय आणि लोकप्रतिनिधी कडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच जमावा कडून एका तरुणाला होत असलेल्या मारहाणी चा व्हिडीओ समाज माध्यामावर व्हायरल करून कट्टरपंथीयाकडुन त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तसेच काही लोकप्रतिनिधीनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देऊन त्यात भर टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून या व्हायरल व्हिडीओची गंभीरपणे दखल घेऊन घटनेची सत्यता तपासण्यात आली, या व्हिडिओ मध्ये ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली तो तरुण ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीला गुजरात राज्यात पळून चालला होता.
हे ही वाचा:
ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील चर्च आणि इमारतींची तोडफोड !
मुख्यमंत्र्यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न कोणाचा?
अहो आश्चर्य! मोदीविरोधक शेहला म्हणते, काश्मीरमध्ये होताहेत सुधारणा
विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !
हे अपहरणाचे प्रकरण २१ जुलै रोजीच अंबरनाथ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले होते. अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे नातलग तिचा शोध घेत वांद्रे येथे आले होते.
वांद्रे टर्मिनस येथून अपहरणकर्त्याच्या तावडीतुन मुलीची सुटका करण्यात आली. त्यावेळी टर्मिनस परिसरात गोंधळ निर्माण होऊन जमाव गोळा झाला व या जमावाने अपहरणकर्त्याला पकडून चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीओ काही जणांनी आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात कैद केला होता. त्यातील एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावर व्हायरल झाला होता अशी माहिती समोर येताच वांद्रे रेल्वे पोलिसानी या व्हिडीओच्या आधारे १० ते १५ अनोळखी व्यक्ती विरोधात मारहाण करणे, दंगल घडवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खराडे करीत आहे.