कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा येडियुरप्पा यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ वर्षीय मुलीच्या आईने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध POCSO (लैंगिक अत्याचार) अंतर्गत आणि कलम ३५४ (ए) (लैंगिक छळ) प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर येडियुरप्पांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्याचा कायदा म्हणजेच POCSO च्या अंतर्गत येडियुरप्पांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येडियुरप्पा यांनी तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. २००८ ते २०११, मे २०१८ मध्ये आणि त्यानंतर जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत.

हे ही वाचा:

राहुल गांधींनी विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास  केली टाळाटाळ; व्हीडिओ व्हायरल

पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम!

अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

अनिल परबांकडून रमजान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांच्या पीडितेच्या आईने गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लैंगिक अत्याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी घडली होती. जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.

Exit mobile version