बनावट आदेशावरून विशेष सरकारी वकील बनून एका महत्वाच्या गुन्ह्यात सत्र आणि उच्च न्यायालयात उभे राहणारे वकील शेखर जगताप आणि विशेष सरकारी वकीलाची नेमणुकीचे बनावट आदेश काढणारे गृहविभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांच्यासह पाच जणांविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात काही वर्षांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच व्यवसायिक यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या खंडणीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी आणि व्यवसायिक संजय पुनामिया हे आरोपी होते.
या गुन्ह्यात दोन पोलीस अधिकारी आणि संजय पुनामिया यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपविण्यात आले होते. या प्रकरणात स्थानिक न्यायालयात सरकारी वकील म्हणून शेखर जगताप हे होते, स्थानिक न्यायालयात अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन नाकारण्यात आल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून शेखर जगताप यांनी आरोपीच्या जामिनासाठी विरोध केला, त्यामुळे सत्र न्यायालयात देखील आरोपीचा जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर आरोपींची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
त्या ठिकाणी विशेष सरकारी वकिलाच्या रूपात शेखर जगताप हे यांनी आरोपीच्या जामिनासाठी विरोध केल्यामुळे आरोपीचा जामीन होऊ शकला नाही. दरम्यान काही महिन्यांनी आरोपी संजय पुनामिया हे जामिनावर बाहेर पडल्यावर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली वकील शेखर जगताप यांची सत्र आणि उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक होती का याबाबत माहिती मागवली असता पुनामिया यांना शेखर जगताप यांची सत्र आणि उच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आली नव्हती अशी माहिती समोर आली.
दरम्यान विशेष सरकारी वकील म्हणून शेखर जगताप यांनी सत्र आणि उच्च न्यायालयात सादर केलेली नेमणुकीचा आदेश कोणी काढला व याबाबत माहिती मिळवली असता गृहविभागावाचे उपसचिव किशोर भालेराव यांनी शेखर जगताप यांची बनावट आदेश काढल्याची माहिती समोर आल्यानंतर पुनामिया यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा:
जगन्नाथपुरी मंदिरात घुसखोरी करणाऱ्या नऊ गैर-हिंदू बांगलादेशींना घेतलं ताब्यात
राममंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्यामुळे काँग्रेसच्या मोधवाडियांचा पक्षाला ‘राम राम’
तापस रॉय यांचा टीएमसी आमदारकीचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची शक्यता!
इस्त्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोगाची लागण
हे प्रकरण बाहेर येताच गृहविभागाचे उपसचिव किशोर भालेराव याना २९ जानेवारी २०२४ रोजी निलंबित करण्यात आले, पोलीस तपासात हे आदेश बोगस होते हे निष्पन्न होताच रविवारी कुलाबा पोलिसांनी संजय पुनामिया याचा जबाब नोंदवून वकील शेखर जगताप, गृहविभागाने तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव, मारिन ड्राईव्ह गुन्हयातील फिर्यादी श्यामसुंदर अग्रवालसह पाच जणांविरुद्ध फसवणूक, बोगस दस्तवेज तयारकेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.