उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालेगावचे उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारणानंतर मालेगावात खळबळ उडाली आहे.
अद्वय हिरे यांच्या विरोधात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीमध्ये नोकरी लावून देण्यावरून फसवणूक केल्याचा हिरे यांच्यावर आरोप आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी या या संदर्भात आंदोलनही केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे आणि त्यांचे निकटवर्तीय लकी खैरनार यांच्यासह ४ जणांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये सटाणाच्या राजेंद्र गांगुर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
हे ही वाचा:
देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’
अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?
घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला
अद्वय हिरे यांच्या विरोधात दुसरा गुन्हा रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यामध्ये सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. बँकेची दिशाभूल केल्याचाही आरोप हिरे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्वय हिरे यांच्यासह हिरे कुटुंब आणि संचालकांवर जिल्हा बँकेने फिर्याद दाखल केली आहे.
अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. आधी भाजपमध्ये असलेले अद्वय हिरे यांनी गेल्या वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी हिरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याचे म्हटले जात होते. पक्ष प्रवेश झाल्यानंतर हिरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली होती.