31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामानूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा 'आप' नेत्यावर आरोप

नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप

२ ऑगस्ट रोजी दाखल केला होता गुन्हा

Google News Follow

Related

हरियाणातील नूंह येथे हिंसाचारादरम्यान आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक अहमद जावेद यांच्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला ठार मारण्यासाठी जमावाला उद्युक्त केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणातील आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक अहमद जावेद यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, जावेद यांनी ३१ जुलै रोजी सोहनाच्या निरंकारी चौकात बजरंग दलाचे नेते प्रदीप कुमार यांची हत्या करण्यासाठी जमावाला भडकवले. ‘आप’ नेत्याविरोधात २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा फेक कॉल

शह आणि मात की शह आणि माफ?

ज्या इमारतीतून दगडफेक झाली त्या नूँहमधील हॉटेलवर बुलडोझर

…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!

प्रदीप कुमार यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांच्यासोबत असलेला बजरंग दलाचा आणखी एक कार्यकर्ता पवन कुमार सोबत होता. त्यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद यांनी काही लोकांसह त्यांचे वाहन थांबवले आणि जमावाला प्रदीपवर हल्ला करण्यास सांगितले. तेव्हा प्रदीप घराकडे जात होते. नल्हार मंदिरातून पोलिसांनी त्यांची सुटका केली. काही अंतरापर्यंत पोलिसांचे वाहन त्यांच्यासोबत आले, परंतु पुढे रस्ता मोकळा असल्याचा दावा करत पोलिस दुसऱ्या मार्गाने गेले. पोलिस निघून गेल्यावर एक स्कॉर्पिओ गाडी प्रदीप कुमार यांच्या वाहनाच्या मागे लागली. त्यानंतर त्यांनी बजरंग दलाच्या नेत्याच्या वाहनाला ओव्हरटेक केले आणि ते थांबवले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.  

पवनच्या म्हणण्यानुसार, आप नेते जावेद अहमद गाडीत होते आणि त्यांनी सोबतच्या लोकांना प्रदीपला मारण्यास सांगितले. जमावाने दोघांनाही वाहनातून बाहेर काढले आणि त्यांना बेदम मारहाण केली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. डोक्याला मार लागल्याने प्रदीपचा नंतर दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. दंगलीच्या वेळी जावेद हे सोहना चौकात सुमारे २०० जमावाचे नेतृत्व करत होते असा आरोपही पवनने केला आहे.    

जावेद यांनी हे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. मी दोन्ही समाजातील लोकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होतो, असे ते म्हणाले. रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली असताना आपण संध्याकाळी सहा वाजता ते ठिकाण सोडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता परत आल्याचा दावाही आप नेत्याने केला आहे. पवन यांनी नोंदवलेल्या तक्रारीची चौकशी करत आहोत, असे सहायक पोलिस आयुक्त नवीन संधू यांनी सांगितले. आरोप सिद्ध झाले तरच कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा