कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ११ जणांना अटक!

कुणाल सरमळकर यांना नोटीस देऊन सोडले

कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ११ जणांना अटक!

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसैनिकानी खार पश्चिम येथील द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करून राडा घातल्या प्रकरणी शिवसेना (शिंदे) युवा नेते राहूल एन कनाल आणि कुणाल सरमळकर यांच्यासह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून राहुल कनाल
सह ११ जणांना अटक करण्यात आली, तसेच कुणाल सरमळकर यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या अकरा जणांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वाना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींच्या वकिलांनी जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावर तात्काळ सुनावणी होऊन सर्व आरोपीना १५ हजारांच्या जाचमुचल्क्यावर जामिन मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य असलेला स्टँडिंग कॉमेडियन कुणाल कामराचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडीओचे शूटिंग खार पश्चिम येथील द हॅबिटॅट स्टुडिओ मध्ये करण्यात आले होते.

शिवसेना ( शिंदे गट) पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी कनाल यांच्यासोबत अटक करण्यात आलेल्या सरमलकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ” काल रात्री आम्ही कुणाल कामराच्या स्टँड-अप कॉमेडी शोचे शूटिंग झालेल्या हॉटेलमध्ये गेलो होतो. काल रात्री तोडफोड झाली. त्यानंतर, आज (२४ मार्च) पहाटे ३.३० वाजता आम्हाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी मला नोटीस दिली आहे.राहुल कनाल सह इतरांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या अकरा जणांना खार पोलिसांनी सोमवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने सर्वाना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तात्काळ जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले होता. न्यायालयाने राहुल कनाल सह अकरा जणांना१५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

हे ही वाचा :

युनिफाइड पेन्शन योजना १ एप्रिलपासून

‘कचनार’ – प्रकृतीचा अनमोल खजिना, अनेक आजारांवर रामबाण उपाय

केसरी चैप्टर २’ चा टीझर प्रदर्शित

बागलादेशात कट्टरवाद्यांकडून दुर्गा मातेच्या मूर्तींची तोडफोड!

कामरा विरुद्ध गुन्हा दाखल ……
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्याबद्दल कामरा यांच्याविरुद्ध वेगळा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी ही तक्रार दाखल केली होती, ज्यात कामरा यांचे विधान बदनामीकारक होते आणि सार्वजनिक अशांतता भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता.

खार पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कामरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे (बीएनएस) अनेक कलमे समाविष्ट आहेत, ज्यात कलम १३२ (गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), कलम १८९(२) आणि १८९(३) (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने), कलम १९० (शांतता भंग करण्यासाठी जाणूनबुजून अपमान करणे), कलम १९१(२) (सरकारी सेवकाची बदनामी) आणि कलम ३२४ (हिंसाचार भडकवण्याचा हेतू) यांचा समावेश आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी कामरा यांचा एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यांनी हॅबिटॅटमध्ये सादर केलेल्या स्टँड-अप अॅक्ट दरम्यान शिंदे यांची खिल्ली उडवण्यासाठी एका हिंदी गाण्यात बदल करून त्यांना ‘देशद्रोही’ असे संबोधले.

पवार झाले आता पडळकर-पाटलांच्यात खडाखडी ! | Amit Kale | Gopichand Padalkar | Jayant Patil |

Exit mobile version