निकाह समारंभानंतर अवघ्या दोन तासांनी वधूला झटपट तिहेरी तलाक दिल्याबद्दल उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला दिल्या जाणाऱ्या हुंड्यातून एक गाडी गायब असल्याचे पाहून वर लग्नाच्या मिरवणुकीसह माघारी फिरला होता.
कामरान वासी याच्या दोन बहिणी डॉली आणि गौरी यांचे लग्न आग्राच्या फतेहाबाद येथील एका लग्नमंडपात एकाच दिवशी झाले. निकाह समारंभानंतर गौरीचे सासरचे लोक निघून गेले, मात्र डॉलीचा वर मोहम्मद आसिफ हुंड्यात गाडी न दिसल्याने नाराज झाला. त्याचे कुटुंब संतप्त झाले. डॉलीच्या पालकांनी असिफला हुंड्यातील इतर गोष्टींव्यतिरिक्त एक गाडी देण्याचे वचन दिले होते.
हे ही वाचा:
प. बंगालमधील रक्तरंजित निवडणुकांचे पाप माकप, काँग्रेसचे!
पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी बुर्ज खलिफा तिरंग्याने उजळला
सचिन तेंडुलकर करत असलेली जुगाराची जाहिरात बंद करा
चांद्रयान-३ च्या यशस्वी भरारीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा!
डॉलीच्या कुटुंबीयांनी जागेवरच गाडी घ्यावी किंवा त्याऐवजी ५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. जेव्हा डॉलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते इतक्या कमी वेळेत गाडी किंवा रोख रकमेची व्यवस्था करू शकत नाहीत, तेव्हा आसिफ तीनदा तलाक असे शब्द उच्चारत कुटुंबासह लग्नाच्या ठिकाणावरून निघून गेला.
कामरान वासी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आसिफ आणि इतर सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नाव असलेल्या सातही जणांना अटक करण्यात यावी, अशी मागणी वासी यांनी केली होती. ‘तलाक’ हा शब्द तीनदा उच्चारून महिलेला घटस्फोट देणे हा मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा, २०१९अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे.