मंगेश सातमकरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

युवा सेनेच्या महिला पदधिकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप

मंगेश सातमकरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या युवासेनेची पदाधिकारी असलेल्या तरुणीने वडाळा टी टी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली.या तरुणीच्या तक्रारीवरून मंगेश सातमकर यांच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित युवती ही अँटॉप हिल प्रतीक्षा नगर परिसरात राहणारी आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदावर असणारी युवती एमबीएचे शिक्षण घेत असून ती स्थानिक समाजसेवेत सक्रिय आहे. स्थानिक नगरसेवकाच्या ओळखीतून या युवतीची ओळख विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यासोबत झाली होती.

मंगेश सातमकर यांनी या युवतीला स्वतःचे सोशल मीडिया हँडल करण्यासाठी देऊन हळूहळू तिच्याशी जवळीक साधली. मंगेश सातमकर विवाहित असताना देखील त्यांनी या युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करून अनेक वेळा तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केरळमधील ‘वंदे भारत’ वर दगडफेक

काँग्रेसची आता बजरंगबलीला बंदिस्त करण्याची तयारी !

गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या विरोधातील गुन्ह्यांच्या फाईल्स गहाळ

नवा अध्यक्ष झाला तर काय अडचण आहे… अजित पवारांच्या भूमिकेमुळे सगळेच दचकले!

तसेच २ डिसेंबर २०२२ मध्ये त्याने पीडित युवतीला लोणावळा येथे मित्राच्या रो हाऊस घेऊन गेला व त्या ठिकाणी तिच्यावर त्यांनी बळजबरी केल्याचा आरोप युवतीने तक्रारीत केला आहे. त्यानंतर पीडित युवती गर्भवती राहिली व त्याने बळजबरीने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले असे तक्रारीत म्हटले आहे.

मंगेश सातमकर आणि या युवतीच्या प्रेमप्रकरण सातमकर यांच्या कुटुंबियांना कळल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी मला धमकी दिली. तसेच मंगेश देखील सतत धमकावू लागला, असे या युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या पीडित युवतीच्या तक्रारी वरून मंगळवारी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी मंगेश सातमकर यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.

Exit mobile version