मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना १४ नोव्हेंबर रोजी २० किलो गांजासहित अटक केली होती. त्यानंतर झालेल्या तपासातून या आरोपींनी अॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे होते.
दरम्यान या प्रकरणाविषयी स्पष्टीकरण देताना अॅमेझॉनने म्हटले होते की, कोणत्याही प्रकारच्या अवैध उत्पादन विक्रीला कंपनी परवानगी देत नाही आणि असे खरेच घडले असल्यास त्याबाबत कंपनीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
अॅमेझॉनवरून ऑनलाईन गांजाची विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!
ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?
हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट
ग्वालियरचे रहिवासी असलेल्या बिजेंद्र तोमर आणि सूरज उर्फ कल्लू पवैया यांच्याकडून २१.७ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असताना गांजाची ही डिलिव्हरी अॅमेझॉनवरून झाल्याचे समोर आले.
त्याच पार्श्वभूमीवर प्रकरणात आता अॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, देशात एएसएसएल (ASSL) म्हणून काम करणाऱ्या अॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्याच्या कलम ३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.