यूपीएससीने पूजा खेडकरला विचारले, आयएएसची निवड का रद्द करू नये?

बनावट ओळख सादर केल्याबद्दल कारवाई

यूपीएससीने पूजा खेडकरला विचारले, आयएएसची निवड का रद्द करू नये?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. तिच्या संदर्भात रोज नव्याने खुलासे होत असून आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच युपीएससीने कारवाईला सुरुवात केली आहे. यूपीएससीकडून पूजा खेडकर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तुमची आयएएसची निवड का रद्द करु नये? अशा आशयाने नोटीस पाठवली आहे.

पूजा खेडकर आणि तिचे कुटुंबीय चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांनी केलेल्या गैरव्यवहारांची तपासणी सुरू असतानाच आता युपीएससीने प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध बनावट ओळख सादर केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे, तसेच त्यांची उमेदवारी रद्द करण्याच्या हालचाली देखील सुरू असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर हिच्यावर फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक कारवाई सुरू केल्या आहेत. त्यांची सिव्हिल सर्व्हीसची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. सेवा परीक्षा- २०२२ / नागरी सेवा परीक्षा- २०२२ च्या नियमांनुसार ही नोटीस दिली आहे. तसेच भविष्यातील परीक्षा / निवडीपासून बंदी केली आहे.

हे ही वाचा:

पश्चिम त्रिपुरामध्ये १९७१ च्या भारत-पाक युद्धातील २७ मोर्टारचे गोळे सापडले !

निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह गोठवले !

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू लांडाच्या प्रमुख साथीदाराला एनआयएकडून अटक

इटलीतील ‘जी ७’ व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा सहभाग

विशाळ गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती !

नेमकं प्रकरण काय आहे?

पूजा खेडकर हिचे प्रशिक्षण ३ जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाले होते. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावत महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. याबाबत वाद झाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची तत्काळ वाशीम येथे बदली झाली होती. वाशीममध्ये दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता; मात्र आता यावर स्थगिती देण्यात आली होती. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे यामुळे प्रशिक्षणावर असलेल्या पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप झाला, त्याबाबत चौकशी सुरू होती. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली होती. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप आहे.

Exit mobile version