उत्तर प्रदेशमधील लखनऊच्या हजरतगंजमध्ये भोजपुरी गायिका नेहा सिंग राठोड यांच्याविरुद्ध पहलगाम हल्ल्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा सिंग राठोड यांनी मोदी सरकारवर टीका करत पहलगाम हल्ल्याला सत्ताधारी सरकारच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेतील अपयश असल्याचे म्हटले होते. या वादग्रस्त टिप्पणीसाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये नेहा सिंग राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कवी अभय प्रताप सिंह यांच्या तक्रारीवरून ११ कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्याबाबत नेहा सिंग राठोड यांनी काही टिप्पण्या केल्या होत्या, ज्या तक्रारदाराने देशद्रोही म्हणून वर्णन केल्या असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
STORY | UP: Folk singer Neha Singh Rathore booked for 'provocative' social media posts
READ: https://t.co/hOrZV7X7IQ pic.twitter.com/j2wXC6FL1f
— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2025
नेहा सिंग राठोड यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सरकारची चूक म्हटले आहे. त्यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आणि म्हटले की, या घटनेचा बिहार निवडणुकीत राजकीय वापर केला जाईल. त्यांच्या विधानाचे पाकिस्तानातील लोक, तेथील नेते आणि सरकारी संस्था कौतुक करत असून सोशल मीडियावर त्यांच्या विधानाचा वापर भारताविरुद्ध एक पुरावा म्हणून वापरत आहेत.
हे ही वाचा :
सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहिले तर पाकिस्तानींचे रक्तही वाहील
सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन
“इच्छा तिथे मार्ग”, मुख्यमंत्र्यांनी ‘मन कि बात’चा भाग गाडीतच पाहिला!
घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!
गाझियाबादचे भाजप आमदार नंद किशोर गुर्जर यांनीही नेहा राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नंद किशोर गुर्जर यांच्या तक्रारीत नेहा सिंगविरुद्ध एनएसए कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नेहा सिंग राठोड यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरवर त्यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की, माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ते घडले पाहिजे. एवढ्या मोठ्या लोकशाहीत एक सामान्य मुलगी प्रश्न कसे विचारू शकते! लोकशाहीचा आकार पहा! ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, भाऊ! धन्यवाद