अभिनेत्री कंगना रनौटविरुद्ध गुन्हा दाखल

अभिनेत्री कंगना रनौटविरुद्ध गुन्हा दाखल

शीख धर्मियांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमावर पोस्ट करून शीख समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी सिनेअभिनेत्री कंगना रनौटविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत लवकरच कंगनाची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदवून घेतला जाणार आहे. त्यानंतर तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अमरजीतसिंग कुलवंतसिंग संधु हे व्यावसायिक असून ते सध्या मुलुंड येथील गुरु गोविंद सिंग मार्गावरील रमाबाई नगर, पाईपलाईन परिसरात राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटी, नवी दिल्ली येथील सदस्य आहेत. या कमिटीचे अध्यक्ष मनविंदर सिंग सिरसा, मुंबईचे अध्यक्ष जयपाल सिंग सिद्धू यांच्यासह इतर सदस्यासोबत अमरजीतसिंग हे सोमवारी खार पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन कंगणा रनौटविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

हे ही वाचा:

टिपलेला झेल, वाचवलेली धाव आणि अचूक फेक सामन्याचा कौल बदलतात!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अंतरिम वाढ करता येईल का, असा शासनाचा प्रस्ताव

ती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली…

…तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीला लाज नाही का वाटली?

 

या तक्रारीत त्यांनी २१ नोव्हेंबरला कंगनाने तिच्या ट्विटरवर शीख समुदायाच्या विरोधात काही आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य केल्याचे नमूद केले होते. ते वक्तव्य नंतर सर्वच सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. कंगनाने शीख समुदायाला खलिस्तानी दहशतवादी म्हणून संबोधून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शीख समुदायाला मच्छरसारखे चिरडले होते असे अपमानकारक अपशब्द वापरले होते. त्याचा सर्व स्तरावर निषेध व्यक्त झाला होता. या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन खार पोलिसांनी मंगळवारी कंगनाविरुद्ध २९५ अ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा देताना तपास सुरू असल्याचे सांगितले.

Exit mobile version