ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते पालव यांच्यावर अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये जमले होते. जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात मुंब्र्यातील शाखेवरून काही दिवसांपुर्वी वाद झाला होता. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथे दोन्ही गटांत मोठा राडा झाला होता. दरम्यान, उद्धव ठाकरेही मुंब्र्यात पोहचले होते. मात्र, पोलिसांच्या विनंतीमुळे त्यांनी शाखेजवळ जाणे टाळले होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.
हे ही वाचा:
चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता
भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे
मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट
जागतिक दक्षिण देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी; भारताचा दबदबा वाढला
“मुंब्र्यात फुसका बार आला आणि वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा इतका आवाज होता की त्यांना यू टर्न घ्यावा लागला,” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. यावरून ठाकरे गटाच्या कार्यकत्यांकडून अक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.