अरबी समुद्रात बांधण्यात आलेल्या माहीमच्या हाजी अली दर्ग्याला बॉम्बची धमकी मिळाली आहे. दर्गा बॉम्बने देणार असल्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून कॉलद्वारे दिली आहे. हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाजी अली दर्ग्याचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख (४२) यांनी याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे ताडदेव पोलिसांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) कॉल करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस धमकीचे फोन आले. दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याचे सांगत दर्गा तातडीने खाली करण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या कॉलरने पवन असे नाव सांगितले.
हे ही वाचा :
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!
आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?
हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले
संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर
पवन नामक व्यक्तीने शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. दर्गा खाली न केल्यास बॉम्बने उडवून देवू, तसेच मध्ये कोणी आल्यास गोळी घालून ठार मारण्यात येईल, अशी धमकी व्यक्तीने दिली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दर्ग्याची पाहणी केली असून कोणतीही अपरिचित वस्तू आढळली नाही. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.